ताज्या बातम्या

शारदा विद्या मंदिरात ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; मोफत फिजिओथेरपी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित शारदा विद्या मंदिर, कोपरखैरणे येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर, सचिव अंकुश संकपाळ, संचालिका दीपाली संकपाळ, उपाध्यक्ष आनंदा संकपाळ, राजेश देसाई, किसन शिंदे, संजय मोरे, नितीन हिंगे, नवनाथ चिकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, विष्णू शिंदे सर, पांडुरंग संकपाळ, लक्ष्मण दादा कदम यांचीही उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. स्नेहा संकपाळ, डॉ. प्रशांत मोरे आणि संपादक भीमराव धुळप उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व फिजिओथेरपी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. स्नेहा संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हा अॅडव्हान्स फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन क्लिनिक यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, स्ट्रोक, पार्किन्सन, स्पाइनल कॉर्ड इजा, लिगामेंट टिअर्स, मोच, खेळाडूंच्या दुखापती तसेच ऑपरेशननंतरची फिजिओथेरपी व रिकव्हरी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिजिओथेरपी, जुनाट वेदना कमी करण्यासाठी उपचार व मार्गदर्शन, तसेच प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात व्यायाम आणि स्तनपानाबाबतही मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले. आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Scroll to Top