ताज्या बातम्या

सातारा सांगली भाजप उमेदवाराबाबत शिवसेनेचा थंड प्रतिसाद चर्चेला उधाण…

तापोळा(अजित जगताप) : महाराष्ट्र शिवसेनेचे दमदार नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करेक्ट कार्यक्रम करतात. अशी त्यांची ख्याती आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने घाईगडबडीत सत्ता हिसकावून घेतल्याचा राग सर्व शिवसैनिकांना आहे. त्यामुळे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भाजप उमेदवाराबाबत शिवसेनेचा थंड प्रतिसाद मिळत असलेल्या चर्चेला चांगलीच उधाण आलेले आहे.
अद्यापही सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली नाही . त्यामुळे भाजप गोटात खळबळ निश्चितच माजली आहे. असे नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यातील नुकत्याच झालेल्या भेटीचे मुख्य कारण निवडणूक असली तरी याबाबत सातारा जिल्ह्यातील मतदार असलेल्या शिवसेना सदस्यांना विश्वासात घेतले नाही . महायुतीतील दुजाभावाची दरी अद्याप भरून निघाली नाही. त्यातच उपमुख्यमंत्री यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथील आलिशान बंगल्यात भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील भाजपचे दोन मंत्री अथवा आमदार नव्हते. त्याची शल्य शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेला हलक्यात घेऊ नका. एवढीच प्रतिक्रिया जानकर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. राजकारणात कठीण लागलं की, नमते पणा घ्यायचा व मऊ लागले की ढोपऱ्याने खानायचं या वृत्तीला छेद देण्याचे काम या निवडणुकीत होईल ?असे अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात याला अद्याप दुजोरा मिळाला नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासोबत शिवसेना उपनेते व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात अमावस्या दोन दिवस अगोदर आलेल्या उमेदवाराचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच जबरदस्तीने मतदारांना दाखवण्यासाठी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार बातमी दाखवण्यासाठी धडपड सुरू होती. परंतु, वास्तविकरीत्या या भेटीच्या वेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर सातारा जिल्हा परिषदेच्या राड्याची खंत कायम दिसून येत होती.
भाजपला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता असल्यामुळेच भाजपने नमतापणा घेतल्यामुळे सातारा सांगली महाविकास आघाडी मध्ये विजयासाठी पुन्हा नव्या जोमाने प्रचार यंत्रणा राबवत असल्याचे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यास नवल वाटणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या औपचारिक भेटीत मध्ये अनेक गोष्टी घडल्याचे नेत्यांनी मान्य केले. दरम्यान, याबाबत काय चर्चा झाली. हे समजण्यासाठी उमेदवाराशी संपर्क साधला असता त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही. उपमुख्यमंत्र्यांनीही या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या भूमिका संदर्भात बोलणं टाळल्यामुळे उपस्थित पत्रकारांनी फक्त शाल व पुष्पगुच्छ दिल्याची बातमी प्रसिद्ध करून आपला हेतू साध्य केला असल्याचे बोलले जात आहे.

_________________________________

फोटो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात त्यांचा सत्कार करताना भाजप उमेदवार श्री .कदम (छाया- अजित जगताप, सातारा)

Scroll to Top