ताज्या बातम्या
आदर्श शिक्षक, यशस्वी व्यावसायिक, संगीतकार आणि ज्येष्ठ समाजसेवक कन्होजी मोरे गुरुजी यांचे निधनहातभट्टी दारूची माहिती लपवल्यास सरपंच, ग्रामसेवकांसह पोलिसांवर होणार कडक कारवाई; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारामोदानी सरकार ‘अदानी’वर मेहरबान; बेस्ट डेपो, निसर्ग उद्यान, मिठी नदीच्या परिसरासह मुंबईतील शेकडो एकर जमीन मोफत अदानीच्या खिशात – खा. वर्षा गायकवाडसेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाला अंधेरी विकास प्रतिष्ठानाचा विरोधआरोग्य संस्थांच्या बांधकामांना निधीचा अडसर; १३ हजार कोटींच्या प्रकल्पांपैकी केवळ ३,१९९ कोटींचा खर्च; ४,५०४ कोटींचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत..

सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाला अंधेरी विकास प्रतिष्ठानाचा विरोध

मुंबई : अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय खासगीकरण करण्याचा सरकारच्या भूमिकेला अंधेरी विकास प्रतिष्ठानाचा कडाडून विरोध केला. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत वाद सुरू आहे. त्याचे पडसाद अंधेरी विभागात उमटले आहेत. अंधेरी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने मुंबई पत्रकार संघात सेव्हन हिल्स रुग्णालय खासगीकरणाला विरोध या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेला राजेश‌ शर्मा,दिलिपराव माने,दिनकर तावडे,नगरसेवक प्रमोद सावंत ,माजी नगरसेवक क्लाइव डायस,संघर्ष समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज मस्के,शिवनाथ खैरनार, हर्षल मोदी,आदि पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेची क्षमता असतानाही रुग्णालये खासगी संस्थेच्या घशात का घातली जात आहेत, असा प्रश्न राजेश शर्मा यांनी उपस्थित केला. तसेच, आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.अंधेरी येथील मरोळ भागातील १५०० खाटांचे सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आले आहे. याबाबत २००५ मध्ये महापालिका आणि मे. सेव्हनहिल्स हेल्थकेअर प्रा. लि यांच्यात करार झाला होता. मात्र, संस्थेने करारातील एकाही अटीची पूर्तता केली नाही. त्यामुळे २०१८ मध्ये कंपनीला नोटीस देण्यात आली. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.दरम्यान, कोविड काळात सेव्हनहिल्स रुग्णालयाचा वापर कोविड रुग्णालय म्हणून करण्यात आला आणि महापालिकेने तेथे खाटांची संख्या वाढवली. मात्र, सद्यस्थितीत हे रुग्णालय चालवणे महापालिकेला शक्य नसल्याने ते खासगी संस्था मुकेश अंबानी यांना चालवण्यास देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. निविदा प्रक्रिया राबवून कॅप्री ग्लोबल या कंपनीची निवड करण्यात आली. याबाबत अंधेरी विकास प्रतिष्ठांला कळताच विरोधकांनी त्यावर कडाडून टीका केली.हा प्रस्ताव धुडकावून न लावल्यास भविष्यात नायर, केईएम, शीव रुग्णालय देखील खासगी संस्थेला देण्याचे प्रस्ताव येतील, अशा शब्दात नगरसेवक प्रमोद सावंत यांनी संताप व्यक्त केला. पालिकेने विशिष्ट व्यक्तीला जमीन देण्याचा घाट घातला आहे. मुंबईत बहुतांश गोरगरीब जनता असून उपलब्ध रुग्णालयांवर मोठा ताण आहे. अशातच एक रुग्णालय खासगी संस्थेच्या घशात घालू नये, अशीही मागणी पृथ्वीराज मस्के यांनी केली.महापालिका निवडणुकीसाठी १६ डिसेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घाईघाईत प्रस्तावासाठी मंजुरी का दिली, याबाबत चौकशी करावी, अशी मागणी राजेश शर्मा यांनी केली. महापालिकेच्या बहुतांश रुग्णालयांमध्ये एका खाटेवर दोन रुग्णांना झोपावे लागते अशी स्थिती आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर पालिकेने भर द्यावा,माजी नगरसेवक क्लाइव डायस म्हणाले.

Scroll to Top