ताज्या बातम्या
जनहित, कर्मचारीहित आणि मुंबईच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देत बेस्टचा आराखडा सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजीवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न;रामदास आठवले यांची उपस्थितीकराडचा उड्डाणपूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला ९० टक्के काम पूर्ण, कोयना नदीवरील दोन्ही नवीन पूलही सज्ज; कोल्हापूर नाका वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गीजागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘महा आरपेट अभियान’चा दणक्यात शुभारंभ…. दादर चैत्यभूमी येथे शेकडो पर्यावरणप्रेमींची उपस्थितीठाणे पालघर मध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; इतरही महायुतीचेच उमेदवार विजयी होतील – एकनाथ शिंदे यांनी व्यक्त

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘महा आरपेट अभियान’चा दणक्यात शुभारंभ…. दादर चैत्यभूमी येथे शेकडो पर्यावरणप्रेमींची उपस्थिती

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभाग, कोकाकोला बेव्हरेजेस आणि महाराष्ट्र प्रदूषण व हवामान बदल विभाग यांच्या संयुक्त पुढाकाराने ‘महा आरपेट अभियान’चा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचे व्यवस्थापन व नियोजन मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठानने केले.
या अभियानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दादर येथील चैत्यभूमी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शेकडो पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. साधना महाशब्दे, डॉ. धनंजय पाष्टे, ए.एल.एम.चे अनवर खान, प्रभाग समिती अध्यक्ष तथा माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार, सहाय्यक अभियंता किरणसिंग पाटील, कोकाकोला कंपनीचे जनसंपर्क प्रमुख श्री. चिटीसर, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘चकाचक मुंबई’ या प्रभावी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या ‘झिरो गार्बेज’ उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
तसेच पर्यावरण संवर्धन, कचरा वर्गीकरण आणि जनजागृती क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाची मान्यवरांनी प्रशंसा केली.
महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी व पर्यावरण मित्र तानाजी घाग यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर संगम प्रतिष्ठानच्या सचिव ॲड. कोमल घाग यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. यावेळी त्यांनी ‘महा आरपेट अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वी करण्यासाठी संस्थेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
पर्यावरण संरक्षण, कचरा निर्मूलन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top