नवी मुंबई : घणसोली सेक्टर-३ परिसरात दर्जेदार आणि चविष्ट केकसाठी ओळख निर्माण केलेले “केक एम्पायर” हे दुकान आज ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. ताजे, फ्रेश आणि विविध आकर्षक डिझाईन्समधील केक उपलब्ध करून देत असल्याने वाढदिवस, लग्नसमारंभ, वर्धापन दिन तसेच इतर आनंदोत्सवांसाठी अनेक ग्राहक आवर्जून येथे भेट देतात.
“केक एम्पायर”चे मालक किशोर जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर रोडवरील तासगाव गावचे असून त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर घणसोलीमध्ये स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि उत्तम सेवा देण्याच्या त्यांच्या ध्येयामुळे अल्पावधीतच त्यांनी मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.
घणसोलीतील यशानंतर त्यांनी बेलापूर येथेही शाखा सुरू केली असून, तेथील ग्राहकांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केकची उत्कृष्ट चव, स्वच्छता, आकर्षक सजावट आणि वाजवी दर यामुळे “केक एम्पायर”ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
घणसोली रेल्वे स्थानकासमोरील गल्लीत सहज उपलब्ध असलेले हे दुकान परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह ठिकाण बनले आहे. कोणत्याही शुभ प्रसंगासाठी दर्जेदार आणि ताज्या केकची निवड करायची असल्यास नागरिकांनी एकदा तरी “केक एम्पायर”ला भेट द्यावी, अशी भावना अनेक समाधानी ग्राहक व्यक्त करत आहेत.
“चव, गुणवत्ता आणि विश्वास यांचा सुंदर संगम म्हणजे केक एम्पायर”, अशीच ओळख आज या प्रतिष्ठानाने निर्माण केली आहे.




