ताज्या बातम्या

युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘मुंबई रत्न पुरस्कार २०२६’ने होणार गौरव

मुंबई ( उत्कर्ष गुडेकर ) :युवा महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक,पत्रकारिता,सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा “मुंबई रत्न पुरस्कार २०२६” ने गौरव करण्यात येणार आहे.या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे.पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांमध्ये शांताराम गुडेकर,समीर खाडिलकर,सौ.मनस्वी मनवे,मोहन कदम,राजेंद्र भुवड,महेंद्र मनवे,केतन भोज,चंद्रकांत करंबळे,दीपक मांडवकर,जितेंद्र शिंदे,संतोष गावडे आणि सुभाष कोकणे यांचा समावेश आहे.या सर्वांनी आपल्या-आपल्या क्षेत्रात समाजहिताची जपलेली बांधिलकी,लोकसेवा,पत्रकारिता,सामाजिक कार्य आणि जनजागृतीमधील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.पुरस्कार वितरण सोहळा २४ जुलै २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ५ वाजता,मेयर हॉल,अंधेरी (मुंबई) येथे संपन्न होणार असून या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या पुरस्काराच्या माध्यमातून समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा युवा महाराष्ट्र फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Scroll to Top