नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या पथविक्रेता निवडणूक नियम प्रणालीमध्ये नमूद केलेल्या एकूण 20 सदस्य संख्येमध्ये 08 पथविक्रेते सदस्य असणार आहेत. सदरचे 08 पथविक्रेता सदस्य पथविक्रेत्यांमधून निवडणुकीव्दारे निवडून द्यावयाचे आहेत.
त्यास अनुसरून गुरुवार, दिनांक 04 जून, 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी –
सर्वसाधारण महिला राखीव – 1 जागेसाठी 4 उमेदवार निवडणूक लढवणार असून,
सर्वसाधारण( सर्वसाधारण ) – 2 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
राखीव प्रवर्गातील 4 जागा बिनविरोध –
अनुसूचित जाती ( महिला) – 1, इतर मागास प्रवर्ग (महिला) – 1, अल्पसंख्याक (सर्वसाधारण) – 1, विकलांग/दिव्यांग (सर्वसाधारण) – 1 या प्रवर्गात केवळ एक अर्ज पात्र असल्याने या प्रवर्गाची निवडणूक बिनविरोध होत आहे.
अनुसूचित जमाती 1 जागा रिक्त –
अनुसुचित जमाती (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी एकही अर्ज आला नसल्याने सदर जागा रिक्त राहिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम 2026 अंतर्गत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक 20 मे, 2026 रोजी झाली.
यामध्ये एकूण आक्षेप आणि हरकती नंतर 2 अर्ज बाद झाले ( 1 अल्पसंख्यांक आणि 1 विकलांग )
दि. 27 मे, 2026 रोजी सायं. 5.00 पर्यंत एकूण 7 उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले.
सर्वसाधारण – 5, अल्पसंख्यांक – 1, अनुसूचित जाती –1 यांनी अर्ज मागे घेतले.
निवडणूक विषयक कर्मचारी यांचे दिनांक 21 मे, 2026 रोजी निवडणूक विषयक प्रशिक्षण घेण्यात आले असून सर्व तयारी करण्यात आलेली आहे.
तरी या निवडणुकीत शहरातील पथ विक्रेता निवडणूक मतदार यादीत नाव असलेल्या पथ विक्रेत्यांनी दिनांक 04 जून 2026 रोजी आपापल्या विभागात निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजय साबळे यांनी केले आहे.



