पाटण(अजित जगताप) : महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या सातारा जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यग्रस्त क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघू शकत नाही. यासाठी कोयनेत धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये कोअर व बफर क्षेत्राच्या सीमारेषा स्पष्ट नाहीत . सीमा रेषा स्पष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या नाहीत त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्या बाजूला नैसर्गिक पर्यटन प्रकल्पामध्ये बड्या उद्योगपतींनी शिरकाव केला आहे. पोलीस व जिल्हा प्रशासन म्हणजे बड्या उद्योगपतींसाठी रेड कार्पेट टाकणारी संस्था ठरली आहे. येथील नैसर्गिक साधनसामग्री जपण्यासाठी अनेक पिढ्यांनी आदिवासी जीवन जगले आहेत. आता नैसर्गिक पर्यटनाला वाढ होताच उद्योगपतींनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुबलक प्रमाणात जंगल असल्यामुळे इतर भागांतून वाघांचे स्थलांतर करण्यात आले आहे. माणूस केंद्रबिंदू न मानता आता जनावरांची काळजी घेणारे सरकार आले आहे. स्थानिक वन समित्यांना आर्थिक खर्चाचे अधिकार नसल्याने समित्यांचे अनुदान पडून राहत आहे. या बाबीं बाबत चर्चा करण्यासाठी
आंदोलन स्थळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल अक्षय साळुंखे आणि कोयना नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ओलेकर यांनी भेट दिली .
या आंदोलनाला ग्रामपंचायत वनकुसवडे, काठी आणि गावडेवाडी यांनी पाठिंबा दर्शविला आहे .
आंदोलनाचे नियोजन धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे चैतन्य दळवी, सचिन कदम, महेश शेलार, रामचंद्र कदम, विनायक शेलार, बळीराम कदम, दिनेश देसाई, शिवाजी कांबळे, परशुराम शिर्के, सिताराम पवार, सचिन शेळके, जयराम शेळके, राजाराम जाधव, राजू मोरे, चंदा शिर्के, जगाबाई कदम, भागाबाई शिर्के, आनाबाई शिर्के, वैजंता शिर्के, रंजना जाधव आणि मंगल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. वन अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे.
_______________________________
चौकट —
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांना जंगलात सोडताना वरिष्ठ वन अधिकारी रीळ बनवतात आणि माणसांच्या जंगलात पुणे शहरात व्याघ्र प्रकल्पाचा कार्यक्रम घेतात. अशी टीका जनाबाई कदम यांनी केली आहे.
.
_________________________
फोटो — कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे आंदोलन (छाया– निनाद जगताप, पाटण )




