ताज्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे महासचिव तुषार गायकवाड यांचे निधन

प्रतिनिधी: मुंबई काँग्रेसचे महासचिव तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांचे चिरंजीव आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तुषार गायकवाड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी १.०० ते २.०० वाजेपर्यंत विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत अभय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल.
सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Scroll to Top