ताज्या बातम्या

१ मे,महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन जल्लोषात साजरा

मुंबई : महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय अंधेरी कामगार कल्याण केंद्र सान्ताक्रुझ, येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, मराठी भाषा दिन, आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यक्रम
आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात केंद्र प्रमुख सौ.सुष्माताई सावरटकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन समाज भूषण गणेशभाऊ खेडेकर जनसेवक यांच्यासह समाज सेवक आप्पा मांगळे, गोपीनाथ पाठारे, मंगेश मोरे, आणि प्रशांत शेट्टी यांना निमंत्रित केले होते. मार्गदशन करताना गणेश खेडेकर यांनी सर्वच राष्ट्र पुरुषांना विनम्र अभिवादन करून. आज १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या स्वतंत्र लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली. आणि महाराष्ट्र आहे म्हणूनच मराठी आहे. मराठी भाषा आहे, आताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून आपल्याला अभिमान आहे. आणि महाराष्ट्र सर्वांनाच मराठी आली पाहिजे मराठी भाषेचा मानसन्मान राखलाच पाहिजे,मराठी भाषेवर प्रेम केलं पाहिजे असे ठणकावून सांगितले. तर आज त्रिविध पावन दिन आहे असे सांगितले. आज बुद्ध पौर्णिमा आहे, महाराष्ट्र दिन आहे, आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुध्दा आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म दिन. अखंड जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे प्रेम, आदर, विश्वासाने वागण्याची शिकवण देणारे,यांच्या बद्दल माहिती सांगितली. तर महाराष्ट्र निर्मितिच्या इतिहासाचे मार्गदर्शन केले. आणि कामगार दिना बद्दल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी केलेले कायदे हे सर्वसुत असून, कामगारांना माहित आहे. असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाची रुपरेषा,व सूत्रसंचालन मंडळ प्रमुख सौ.सुष्माताई सावरटकर यांनी केले.सोबत कामगार बंधू श्री.मजर खान, व भगिनी सौ.तन्वी रहाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमात सौ.मयुरा मोरे, वैशाली करेकर, रमा अचार्य, अंजळी माळी, राधिका विश्वकर्मा, आस्मा शेख, अल्फिया अन्सारी अदि विभागातील नागरिक उपस्थित होते. सौ. सुष्माताई सावरटकर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली..

Scroll to Top