ताज्या बातम्या

महामानवाला अभिवादनासाठी ज्येष्ठ अभियंता सुनील पोरे यांची ५० कि.मी. सायकलींग

म्हसवड(अजित जगताप) : येथील सामाजिक कार्यकर्ते व शिंपी समाज सातारा जिल्हाध्यक्ष
अभियंता सुनील पोरे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त ५० किलोमीटर सायकलिंग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.
गेली १२ वर्षांपासून म्हसवड येथील शुभम भारत गॅस ऍजन्सीचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते अभियंता पोरे हे दरवर्षी आंबेडकर जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी गोंदवले बुद्रुक, १० डिसेंबर शिखर शिंगणापूर श्रावणातील पहिल्या आठवड्यात पंढरपूर येथे सायकल चालवण्याचा छंद जोपासला आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.
या ही वर्षी त्यांनी ६५ व्या वर्षी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त मंगळवार दि.१४ रोजी सकाळी ५ वाजता घरापासून सायकलिंग सुरू करून दिड तासात गोंदवले येथे पोहचुन तेथील जयभीम युवक ऑर्गनायझेशन आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले . त्यानंतर महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले.व नंतर पुन्हा सकाळी ७ वाजता गोंदवले ते सव्वातासात म्हसवडला पोहोचले.
श्री .पोरे यांच्या या ५० किलोमीटर सायकल चालवून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या उपक्रमाचे बौद्ध समाजासह सर्व समाज बांधवांनी कौतुक केले आहे. अभियंता सुनील पोरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेची चुणक दाखवली आहे. सर्व जाती धर्माच्या युगपरुषांचे विचार आत्मसात करून सर्व धर्म समभाव ते मानत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाचेच ते पालन होत असल्याचे ते मानतात. यावेळी त्यांच्यासमवेत जेष्ठ पत्रकार पोपट बनसोडे हे सुद्धा सहभागी झाले होते.

_________________________________

फोटो– महामानवांना अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ अभियंता सुनील पोरे यांचा पन्नास किलोमीटर सायकलिंग प्रवास… (छाया अजित जगताप , म्हसवड)

Scroll to Top