ताज्या बातम्या

साताऱ्यात महामानवाला अभिवादनासाठी सर्व समाज व संघटना एकवटल्या…

सातारा(अजित जगताप) :: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात सर्व समाज व संघटना राजकीय पक्ष एकवटल्या होत्या. खऱ्या अर्थाने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आता त्याचे आत्मचिंतन करून अनुकरण करणे हे आता काळाच्या हाती राहिले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जयंती निमित्त शुभेच्छा व अभिवादनाचे फलक चौकाचौकात लागले होते. ग्रामीण भागामध्ये पददलीत, दलित, अल्पसंख्यांक, कष्टकरी, शेतमजूर वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले जात होते. अनेक ठिकाणी प्रतिमेंना पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून आंबेडकर आणि शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,सातारा जि. प. अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भैया भोसले, समाजकल्याण उपायुक्त सुनील जाधव, सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर यांच्यासह विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी, रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना कम्युनिस्ट पक्ष विद्रोही सांस्कृतिक मंच, फुले शाहू आंबेडकरवादी विचारांच्या संघटना यांच्यासह अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचाराला अभिवादन केले. यावेळी सर्वत्र जय भीम चा नारा तसेच युगपुरुषांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच आंबेडकर आणि यांची डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर गर्दी जमली होती. या वेळेला शीतपेय व अन्नदान तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त ग्रंथ खरेदी व आंबेडकर चळवळीतील साहित्य विकत घेण्यासाठी पेपर स्टॉल वर गर्दी जमली होती. सातारा पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ग्रंथ वाटण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, अमित वाघमारे, विठ्ठल हेंद्रे, तुषार तपासे, अजित जगताप, राहुल तपासे, गजानन चेनगे, ओमकार कदम, अजित सोनवणे, प्रमोद इंगळे, देवराज कामाठी, तुषार भद्रे, विश्वास शेडगे, प्रमोद इंगळे, जावेद खान , रिजवान सय्यद , प्रकाश वायदंडे, संजय कारंडे, गौरी आवळे, प्रशांत घाडगे, दिलीपकुमार चिंचकर, रामदास आडगळे, यांच्यासह अनेक पत्रकार यांनी आज विनम्र अभिवादन केले. _________________________. फोटो– सातारा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना जनसमुदाय (छाया– निनाद जगताप सातारा)

Scroll to Top