ताज्या बातम्या
सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार“कॅमेऱ्यांना वाहन क्रमांक दिसतो, मग रस्त्यांवरील खड्डे का दिसत नाहीत?” – नागरिकांचा संतप्त सवालराजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनतहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरजयशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कोपरखैरणे येथील शारदा विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील शारदा विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कोपरखैरणे, सेक्टर ८ येथील सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित शारदा विद्या मंदिर स्कूल येथे दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. बाबुरावदादा संकपाळ (मा. जिल्हा परिषद सदस्य, सातारा), संस्थेचे उपाध्यक्ष आनंददादा संकपाळ, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणदादा कदम, बबनदादा संकपाळ, सचिव अंकुश संकपाळ, सदस्य हरिभाऊ संकपाळ, किसन शिंदे, राजेश देसाई, सुभाष संकपाळ यांच्यासह पत्रकार भिमराव धुळप, विष्णु शिंदे सर, संजय मोरे, विजय आवळे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमादरम्यान विविध वेशभूषा परिधान करून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच प्रेरणादायी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अध्यक्ष रमेश संकपाळ सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालिका दिपाली संकपाळ मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त व देशप्रेमाच्या भावनेने परिपूर्ण ठरला.

Scroll to Top