ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यात अडीचशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार



सातारा (अजित जगताप) : शुक्रवार दिनांक ३१ मे म्हणजे महिना अखेर पण, याच दिवशी सातारा जिल्ह्यातील केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय- निम शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस म्हणून चांगलाच गाजला. पूर्वी शाळा प्रवेशासाठी दिनांक एक जून ही जन्मतारीख म्हणजे वाढदिवस असे समीकरण झाले होते. आज या समीकरणाची शेवटची पिढी म्हणून काहींचा सेवानिवृत्ती निमित्त सातारा जिल्ह्यात सुमारे अडीचशे सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचा विविध कार्यालयात सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये १९८० साली तात्कालीन मुख्यमंत्री शंकर राव चव्हाण यांनी महाराष्ट्रात प्रथमच झिरो बजेट आणल्यामुळे शासकीय सेवेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा शासकीय सेवेत भरती झाली. आता त्यावेळी भरती झालेली पिढी आता सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहे. त्यामुळे ३१ मे रोजी सातारा जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात सेवानिवृत्तीचा सोहळा पाहण्यास मिळाला.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर शासकीय- निमशासकीय व अनुदानित अशा विविध संस्था आहेत .या संस्थेमध्ये ३१ मे या दिवशी ज्यांची सेवा निवृत्ती झाली आहे. अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सापत्नीक सत्कार करून त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच दीर्घ आयुष्य लाभो. अशी शुभकामना केली आहे.
यामध्ये पोलीस , नगर पालिका,नगरपंचायत,पंचायत समिती सातारा जिल्हा परिषद, पाटबंधारे ,आरोग्य, शिक्षण, महसूल, विमा तसेच विविध केंद्र व राज्य सरकारच्या अनेक कार्यालयात आज सकाळपासूनच सेवानिवृत्ती निमित्त सोहळा व त्यानिमित्त स्नेह भोजन असे भरगच्च कार्यक्रम झाले.

अलीकडच्या नव्या पिढीतील अनेक जण शासकीय सेवेत असले तरी काहींना कंत्राटी पद्धतीने तर काहींना विना सेवानिवृत्ती वेतनावर काम करावे लागणार आहे. याबद्दलच्या परिस्थितीनुसार आता सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा असे म्हणण्याची पाळी आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याकडे पाहून म्हणावे लागत आहे. आता सेवानिवृत्तीनंतर घरगुती कामे व शेती तसेच पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळणार आहे.

Scroll to Top