ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

“चलो सातारा” रस्ते बंद, वाहतूक ठप्प; १०५ गावांचा संताप  २३ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा मोर्चा

प्रतिनिधी(भीमराव धुळप)

: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, देवसरे, कादांटी व आसपासच्या १०५ गावांचे जनजीवन पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच विस्कळीत झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून, सोमवार, दिनांक २३ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. महाबळेश्वर-तापोळा रस्ता: निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता तुटून वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामध्ये कुरोशी-येरणे रस्ता: गेल्या अडीच वर्षांपासून टेंडर मंजूर असूनही काम सुरु न झाल्याने देवसरे पुलाचे काम अचानक पावसाच्या तोंडावर सुरू. अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला. दरे- कादांटी (२२ किमी) रस्ता: साईट पट्टी खोदलेली असून एसटी व लाँच सेवा पूर्णतः बंद. झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. रस्ते व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने आरोग्य, शिक्षण, कामधंदा व दैनंदिन गरजांवर मोठा परिणाम झाला आहे. एसटी प्रशासन जबाबदार नसून, ठेकेदारांची उदासीनता व काही अधिकाऱ्यांची मनमानी ही या संकटाची मुळं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर, ४३ गाव समाज, ३२ गाव समाज, २२ गाव समाज आणि १६ गाव समाज अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे हे आंदोलन छेडण्यात येत आहे.

“माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा” यांना निवेदन देऊन या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

Scroll to Top