ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
वडिलांविषयी फारसं कोणी लिहित नाही म्हणून वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्या भावना एकत्र करण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय ‘वडील’ आहे. प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुस्तक तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकाने निबंध हा स्वतःच्या अक्षरात लिहिलेला असावा, शब्दमर्यादा 1000 पेक्षा जास्त नसावी. निबंध पाठवण्याची शेवटची तारीख रविवार दि.31 ऑगस्ट 2025 राहील. सदर निबंध ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने पाठवावेत. किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल वर पाठवावेत असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी केले आहे.
साहित्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुस्तकांचं झाड, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, गणेश-नवरात्र वार्तांकन स्पर्धा, स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय इत्यादी वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.

Scroll to Top