ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

डायलसिस उपचार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात जगातील पहिल्या ए आय मशीन द्वारे स्वदेशी उपचार

मुंबई : ग्रामीण भागातील व शहरी भागातील रुग्णांना डायलसिस उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर रेनलिक्स या जगातील पहिल्या स्वदेशी मशीन द्वारे सामान्य नागरिकांना आता डायलसिस उपचार माफक दरात मिळणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत कंपनीचे संस्थापक संचालक डॉ. शाम वासुदेव राव यांनी दिली.

यावेळी बोलताना राव म्हणाले, ग्रामीण भारत आजही अनेक वैद्यकीय सोयी सुविधा नसल्याने मागास आहे. जगात वेगाने क्रांती होत आहे. आमची कंपनी पुढील चार वर्षासाठी उत्पादन वाढविण्यासाठी ८०० कोटींची समभाग विक्री करणार आहे. यावेळी कंपनीचे पदाधिकारी सुरेश बी, रामन वेंकट, श्रीनाथ एच पी उपस्थित होते.

मूत्रपिंड आजार, हृदय व रक्तवाहिन्या, फूफस या व इतर आजारावर ग्रामीण भागातील रुग्णांना याचा जास्त लाभ होणार आहे. अचूक व लवकर उपचार होण्यासाठी ए आय असणारे हे मशीन महत्वाची भूमिका बजावणार आहे. शहरी भागातील रुग्ण एकत्र येऊन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे मशीन विकत घेऊ शकतात.असे
डॉ. शाम वासुदेव राव यांनी सांगितले.

Scroll to Top