ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न

सुपने (ता. कराड) : शिवछत्रपती कुस्ती केंद्र, सुपने येथे आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप आणि प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथराव पाटील सभागृहात गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हस्ते उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे संयोजन v अध्यक्ष बलराज पाटील (आण्णा) यांनी केले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जे. आर. पाटील (नाना), सर्जेराव पाटील (बापू), अनिल पानुगडे, भाऊ पाटील, हिंदुराव पाटील, भागोजी बडेकर, तुकाराम मोरे, ग्रा. पं. सदस्य अमृत पाटील, राजकुमार पाटील, युवा नेते व कार्यकारी सरपंच विनोद पाटील, हनुमंत पाटील (फौजी), दादा पाटील (फौजी), माजी सरपंच सतीश पानुगडे, बाळासाहेब कोळी, सौ. सोनाली शिंदे, पैलवान साहिल पाटील तसेच गावातील आजी-माजी कुस्तीपटू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच अजित जाधव यांनी केले. प्रास्ताविक हिंदू एकता अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले. यावेळी जे. आर. पाटील आणि वस्ताद प्रशांत पाटील, प्रदीप बाबर (वस्ताद) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार भिमराव कुंभार यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्रात नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देऊन गावाच्या कुस्ती परंपरेला पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.

Scroll to Top