Sunday, April 20, 2025
घरदेश आणि विदेशराजकोट येथे टीआरपी गेमझोनमध्ये अग्नितांडव लहान बालकांचा समावेश २२ जणांचा मृत्यू

राजकोट येथे टीआरपी गेमझोनमध्ये अग्नितांडव लहान बालकांचा समावेश २२ जणांचा मृत्यू


प्रतिनिधी : डोंबिवलीमधील स्फोटाच्या घटनेनंतर आता गुजरात राज्यामधील राजकोट येथील टीआरपी या गेमझोनमध्ये मोठी आग लागलीये. या आगीमध्ये एकून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या गेम झोनपासून एक किलोमीटर परिसरामध्ये धुर पसरला आहे. शाळकरी लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांची या ठिकाणी गर्दी होती, ही घटना घडली त्यावेळी लहान मुलेही उपस्थित होतीत. या मुलांचं काय झालं याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. एकंदरित अग्नितांडव पाहता मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले आहे आहेत.
राजकोटचा हा गेम झोन आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे, कारण आगीत जळल्याने त्यांचे चेहरे ओळखू येत नाहीयेत. गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती समजत आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.
राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केलं आहे.

नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेम झोनमध्ये आग विझवण्यात अडचणी येत आहेत. जोरदार वारेही वाहत आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडचण येत आहे, असं ग्निशमन दलाचे अधिकारी आयव्ही खेर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments