मनातून अजून कोरोना न गेलेल्या त्या मतदारांना विश्वास देण्याचे काम करत आहे – खासदार राहुल शेवाळे
प्रतिनिधी(रमेश औताडे) : कोरोना वैद्यकीय दृष्ट्या संपला असला तरी
जनतेच्या मनातून अजून कोरोना गेला नाही. कोरोना नंतरची प्रथमच निवडणूक आहे. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप करणाऱ्या पुढाऱ्यांचा राग आला आहे. मतदारांची मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थिती गंभीर आहे. त्यांना सर्व बाजूंनी विश्वास देण्याचे काम प्रचारादरम्यान मी करत आहे. आणि मला खात्री आहे माझा मतदार मला पुन्हा निवडूण देणार आहे. असे मनोगत खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.
नगरसेवक ते खासदार या प्रवासादरम्यान मुंबई मराठी पत्रकार संघ व इतर सर्व पत्रकारांनी मला मार्गदर्शन केले. मी केलेल्या कामाचे कौतुक केले. यामुळे आज भारतातील टॉप टेन खासदारापर्यंतचा टप्पा मी गाठला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व मतदारांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असल्याने मला दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मतदार देणार असल्याची प्रचिती प्रचारादरम्यान दिसत आहे. सर्व मतदार माझे प्रेमाने स्वागत करत आहेत यातच माझा विजय नक्की आहे असे शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
धारावीत माझा जन्म झाला असल्याने धारावीचा व पर्यायाने मतदार संघाचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या असून काही सुरू केल्या आहेत.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,कार्यवाह संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे उपस्थित होते.