प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील वाहिनी धर्मरक्षक संभाजी मधील सरनौबत हंबीरराव मोहिते यांचे व्यक्तिमत्त्व साकारणारे अभिनेते अनिल गवस यांच्या नेतृत्वाखालील दहिसरच्या ज्येष्ठ नागरिक परिवाराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ महिलांनी नृत्य व गाणी सादर केली. वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या समारंभास संस्थापक सुरेश ठाकूर व सौ. सीमा ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई, विकासक व सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत आणि शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, शिवभक्त राजू देसाई उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराचे अध्यक्ष नाट्यसिने अभिनेते अनिल गवस, उपाध्यक्ष भुषण मुळे, कार्याध्यक्ष किरण देसाई, जनार्दन राणे, खजिनदार गिरिधर घाटे, उर्मिला कालेलकर , प्रदीप परब, पाटील, स्मिता भाटकर, तुषार बांदिवडेकर, महेश बागवे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नृत्य, गाणी, स्पर्धांनी साजरा झाला वर्धापन दिन ; दहिसर ज्येष्ठ नागरिक परिवाराचा उत्साह ओसंडून वाहिला
RELATED ARTICLES