तामिळनाडू : तामिळनाडूतील रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनममध्ये डिएमके (DMK) पक्षाच्या युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने सांगितले की, “माझ्या नवऱ्याचे कामच म्हणजे २० वर्षांच्या मुलींना राजकारण्यांसोबत जबरदस्ती झोपायला लावणे.” तिने असेही सांगितले की, कॉलेजला जाताना तिच्यावर हल्ला करण्यात आला, तिला जखमी करण्यात आले आणि तिचा मोबाईल फोन फोडण्यात आला. जेव्हा ती पोलिसांकडे गेली, तेव्हा तिला जीवाची धमकी देण्यात आली.
पीडितेने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना AIADMKचे नेते एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “हे अत्यंत धक्कादायक आहे की सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी महिलांना राजकारण्यांसाठी उपलब्ध करून देतो.”
ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यात उशीर केला कारण आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे. “Pollachi प्रकरण मी CBI कडे दिलं, पण सध्याच्या सरकारने अरक्कोनम प्रकरणात योग्य कारवाई केली नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
द्रमुक (DMK) पक्षाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, पोलिस चौकशी सुरू आहे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.