Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रअक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मेट्रो स्थानकात " एव्हरलाइट

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मेट्रो स्थानकात ” एव्हरलाइट

मुंबई(रमेश औताडे) : दागिन्यांच्या बाजारपेठेत एक नवा मापदंड स्थापित करत सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सने आपले नवे एव्हरलाइट बाय सेन्को स्टोअर मुंबईतील वर्दळीच्या अंधेरी मेट्रो स्थानकात सुरू केले आहे. या प्रकारचे हे पहिलेच स्टोअर आहे.

अंधेरी मेट्रो स्थानकातील स्टोअरच्या या भव्य उद्घाटन सोहळ्यातील ग्लॅमर आणि उत्साह वृद्धिंगत करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर उपस्थित होती. मानुषी छिल्लर म्हणाल्या, “सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या नवीन स्टोअर लाँचचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे.

या उद्घाटनाबद्दल सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या संचालक जोइता सेन म्हणाल्या, “मुंबईचे आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि सेन्कोचा अनुभव मुंबईच्या मेट्रो नेटवर्कच्या केंद्रस्थानी आणत आहोत. मुख्य महाव्यवस्थापक धवल राजा म्हणाले, “अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भारतात आमची उपस्थिती वाढवत असताना एव्हरलाइट बाय सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड्सचा हलक्या वजनाच्या दागिन्यांचा संग्रह नवीन स्टोअरमध्ये सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments