Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रAI युगासाठी सज्ज MS-CIT: MKCL कडून क्रांतिकारी पाऊल

AI युगासाठी सज्ज MS-CIT: MKCL कडून क्रांतिकारी पाऊल

प्रतिनिधी : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI Powered’ या नावाने नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता 100 हून अधिक AI टूल्स व 400 पेक्षा अधिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Digital Divide कमी होत असतानाच आता AI जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी तयार होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी MKCL ने हा कोर्स नव्याने तयार केला आहे. ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारख्या टूल्सचा वापर, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल व्यवहार, आणि AI वापरून अभ्यासात किंवा कामात कशी मदत मिळवता येईल, याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे.

राज्यातील 4500 हून अधिक अधिकृत केंद्रांमधून हा कोर्स शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संगणक साक्षरतेबरोबरच नवयुगातील तंत्रज्ञान कौशल्ये देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, गृहिणी, शिक्षक, व्यावसायिक, स्टार्टअप सुरू करणारे तरुण तसेच नोकरीच्या शोधात असलेले युवक/युवती यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. 10वी व 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनीही ही संधी न गमावता नव्या युगातील पहिलं स्मार्ट पाऊल उचलावे, असे आवाहन MKCL कडून महाव्यवस्थापक नटराज कटकधोंड, मुंबई विभाग समन्वयक इंद्रनील मयेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.यावेळी mkcl चे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments