प्रतिनिधी – लोकसभा निवडणूकीचे बिजुल वाजल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले.शिवसेनेने सुद्धा लोकसभा गटनेते व विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचे पहिल्या यादीत नाव घोषित केले होते. त्यानंतर शेवळे यांनी प्रचाराची रणनीती आखत प्रचाराचा शुभारंभ केला.मंगळवारी खा.शेवाळे यांची धारावीत प्रचार रॅली होती.त्यांनी धारावीकरांचे दैवत खांबदेव बाबा यांचे मनोभावी दर्शन घेतले व प्रचाराला सुरुवात केली.धारावीतील खांबदेवनगर,मुकुंदनगर,काळाकिल्ला,९० फीट रोड व संत रोहिदास मार्गावरील भागात प्रचार केला. यावेळी प्रत्येक ठिकाणी खासदार राहुल शेवाळे यांचे कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केले.
या प्रचार रॅलीत शिवसेना,भाजपा, मनसे,आर पी आय आठवले गट,व इतर घटक पक्षाचा समावेश होता.या प्रचार रॅलीत शिवसेना विभागसंघटक प्रवीण जैन,अशोक थोरात,मनोज चौरसिया यांच्यासह अनेक पदाधिकारी होते.कॉग्रेसमधून शिवसेनेत आलेले कुणाल माने,भाजपचे उदय नांदे,रमाकांत गुप्ता,गोवर्धन चव्हाण,मनसेचे विभागाध्यक्ष राजेश सोनवणे व इतर पदाधिकारी,आर पी आयचे कार्यकर्ते यांच्यासोबत महिला आघाडी देखील या रॅलीत सहभागी झाली होती.काळा किल्ला येथे जोतीबाची पालखी येणार असल्याने भाविकांची काळाकिल्ला नाक्यावर प्रचंड गर्दी बघायला मिळत होती. ,यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी दख्खनचा राजा जोतिबा पालखीचे देखील मनोभावी दर्शन घेतले.
