प्रतिनिधी : डॉ बाबासाहेब आणि महाबोधी विहार तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ असो (रजि). देवनार मुंबई च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देवनार गोवंडी याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती नुकतीच मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.
जयंती प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन चे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मुंबई महानगर पालिका अधिकारी श्रीम.स्वाती केदारे यांनी महिला सक्षमीकरण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महीलांसाठी योगदान हा विषय घेऊन पुरुष प्रधान संस्कृतीत भारतीय संविधानाद्ववारे महीलांना कसे अग्रस्थानी आणून ठेवले आहे याचे सविस्तर विवेचन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल या बाबत भाष्य करतांना स्वाती केदारे म्हणाल्या की महिलांसाठी नोकरीतील आरक्षण, आईवडील तसेच पत्तीच्या संपत्तीमधील हक्क, विधवा महिलांसाठी पुनर्विवाह करणे, दत्तक मुलं घेणे,पुरुषाच्या बरोबरीने काम करतांना समान काम समान वेतन, बाळंतपणानंतर तसेच बालसंगोपन महीला कर्मचारी म्हणून त्यांना मिळणारी भरपगारी रजा,विधवा महिलांसाठी विशेष सरकारी मिळणार्या सवलती इत्यादी अशा अनेक महीलांसाठी मिळाणारे हक्क तसेच विशेष अधिकार या हिंदू कोड बिलाद्वारे महिलांसाठी प्राप्त झाले होते, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हे महीला सक्षमीकरण करीता आणलेले बिल त्यावेळच्या राजकारण्यांनी लोकसभेत पारीत करु दिले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दुःखी होऊन तत्कालीन मंत्री मंडळातील कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला.
नंतर हेच बिल तुकड्यांमध्ये विभागून संसदेत पारीत करुन घेतले.
आज आपण सर्वच जण हक्कांबाबत आणि अधिकारवाणीने भांडतो ते फक्त भारतीय संविधानामुळे.
त्यामुळे सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,हक्क प्राप्त झाले आहेत ते फक्त भारतीय संविधानमुळे!
अन् याचे श्रेय जाते ते फक्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना!
त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीचा महिलांनी विशेष करुन अभ्यास केला पाहीजे असे सुतोवाच स्वाती केदारे यांनी सर्वं उपस्थितांना संबोधित केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीचा अभ्यास विशेषतः महीलांनी केला पाहिजे—श्रीम स्वाती केदारे.
RELATED ARTICLES