प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ विदर्भ वगळून
बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार जाहीर केले आहेत,त्यानुसार
उमेदवार यादी पुढीलप्रमाणे १. जालना – शाम रस्तुमराव शिरसाट पाटील, २. बीड – अॅड. माणिक आदमाने,३. औरंगाबाद – प्रा. अरविंद कांबळे, ४. बारामती – रोहिदास बाळासो कोंडके, ५. सातारा – सयाजी वाघमारे, ६. रायगड – संतोष हिरवे,असे उमेदवार असतील. उर्वरित बी.आर.एस.पी. लोकसभा उमेदवार यांची यादी लवकरच घोषित केली जाईल. जाहीर उमेदवारांना बहुजन समाजाने मतदान व आर्थिक सहाय्य देवून विजयी करावे आणि महाराष्ट्रातील स्वतंत्र साभिमाणी, बहुजनवादी फुले-शाहू-आंबेडकरी स्वतंत्र पर्यायी राजकारण मजबूत करण्यासाठी बीआरएसपी उमेदवारांना सर्वत्तोपरी सहाय्य करा व आपली राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी बीआरएसपी उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष घटनातज्ञ डॉ सुरेश माने यांनी केले आहे.
