प्रतिनिधी : खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महाविकास आघाडीची आज मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. “कौतुक वाटतं टीकेचं. घटस्फोट होऊन सहा महिने झाले. मात्र 18 वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करत आहेत”, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. “हे इलेक्शन आमच्या हातात नाही तर जनतेच्या हातात आहे. लोक बोलतात धमकी येते. पण धमकी येत असेल मला फोन करा”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.
घरातला मोठा माणूस असेल तर दोन पावले मागे राहून काय ते काम करावं. यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला मविआ एकत्र लढणार आहे. त्यांनी कितीही खालच्या पातळीवर भाषणे केली तरी आम्ही आमची भाषणांची उंची वाढवत राहणार. माझी लढाई त्या अदृश्य शक्तीसोबत आहे. शिरूर मतदारसंघात फॉक्सॉन प्रकल्प इन्वेस्टमेंट येणार होती. 2 लाख रोजगार येणार होते. मात्र त्या 2 लाख नोकऱ्या घालवायचं कोणी काम केलं असेल तर आता असलेल्या सत्ताधाऱ्यांनी”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
मला सहकार्य आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. अमोल कोल्हे आणि माझ्यावर अनेक वेळा टीका होते. ही निवडणूक महाराष्ट्रातील जनतेने हातात घेतली आहे. जो कुणाला धमकीचा फोन येतो त्यांनी माझा नंबर द्या. आम्ही डंके की चोट पे संसदेत प्रश्न विचारू. आजपर्यंत स्थानिक निवडणूकमध्ये लक्ष घातलं नाही. कारण वडीलधारी मंडळी काम करत होते. लोकसभा नंतर ग्रामपंचायतपर्यंतच्या सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. माझ्या कामाचा जाहीरनामा वाचल्यानंतर मतदार मला मतदान करतील. माझी लढाई ही अदृश्य शक्तीविरोधात आहे. आम्ही ताकदीने निवडणूक लढणार आहोत. यावेळी चिन्ह बदललं पण आम्ही पक्ष चोरला नाही तरी आमचं चिन्ह चोरल गेलं. शारदाबाई पवार यांची मी नात आहे. माझ्या आजीने रडायला नाही लढाईला शिकविले”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
