प्रतिनिधी – हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियम लीग २०२४ KTPL – 3 या क्रिकेट स्पर्धा शनिवार रविवार १३ व १४ एप्रिल २०२४ ला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानात होणाऱ्या या स्पर्धेत बक्षिसाची लयलूट तर होणारच पण ही स्पर्धा जिंकून गुलाल कोण उधळणार याचीच चर्चा सध्या मुंबईसह सातारा,कराड मधील क्रिकेट प्रेमी करताना दिसत आहेत.
सदर स्पर्धा कराड तालुका क्रिकेट असोशियन यांनी आयोजित केली असून या स्पर्धेत एकूण आठ संघमालक सहभागी होणार आहेत. आठ संघ आणि त्याचे खेळाडू ही स्पर्धा रंगवणार आहेत.
या स्पर्धेसाठी संघटनेचे आधारस्तंभ दीपक दादा लोखंडे असल्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडत नसते. हे सर्व खेळाडू व संघमालक यांना माहीत आहे. त्यांच्या जोडीला अध्यक्ष पै.विशाल पाटील सुद्धा ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचे सन्मानचिन्ह अनावरण करण्यात आले होते. यावेळी आठ संघ मालक उपस्थित होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक लोखंडे,अमित शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.