प्रतिनिधी : मराठी, हिंदी,तमिळ, तेलुगू ,कन्नड अशा अनेक मनोरंजनसृष्टीवर अधिपत्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आले. साताऱ्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

काल छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात ते दाखल झाले होते. छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या. त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्यानंतर तत्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली.
सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाले की, सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन चेकअप म्हणून त्यांनी काही तपासण्याही करुन घेतल्या होत्या.
दरम्यान, ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका व्हेन 99% ब्लॉक असल्याचे समजले आणि तत्काळ त्यांची अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली होती. यातही मायनर दोष सापडले होते. सयाजी शिंदे यांना अँजिओग्राफी करण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओप्लास्टी करण्याचं ठरवले.
हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये एक 99 टक्याच्या ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाहिल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते आणि त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितलं आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. येत्या दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले आहे.