Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित आघाडीची दुसरी यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित आघाडीची दुसरी यादी जाहीर

प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात तिसरी आघाडी उघडल्यानंतर पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. वंचितने पहिल्या यादीमधून 8 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या यादीमधून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत 2 बौद्ध उमेदवारांचा समावेश आहे. 

वंचितने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते बौद्ध समाजातून येतात. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बौद्ध मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच वंचितने राहुल गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे.  माढा लोकसभा मतदारसंघातून रमेश बारस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारस्कर हे लिंगायत माळी समाजातील आहेत. वंचितने दुसऱ्या यादीतून सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापुरातून उमेवदवारी जाहीर केलेले राहूल गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते  आहेत. मागील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून सोलापुरात स्वतः प्रकाश आंबेडकर हेच उमेदवार होते. यंदा मात्र राहुल गायकवाड यांना वंचितने संधी दिली आहे राहुल गायकवाड यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. 

साताऱ्यात मारुती जानकर यांना उमेदवारी 

प्रकाश आंबेडकरांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून मारुती जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जानकर हे धनगर समाजातील आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने उदयनराजेंना उमेदवारी घोषित केली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार घोषित केलेला नाही. प्रकाश आबंडकरांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात जैन उमेदवार देते नवा डाव टाकला आहे. 

वंचितचे दुसऱ्या यादीतील 11 उमेदवार कोणते?

रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध

जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर

मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम

रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी

हिंगोली – डॉ. बीडी चव्हाण   – बंजारा

लातूर – नरिसिंहराव उदगीरकर – मातांग

सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध

माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)

सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर

धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम

हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments