मुंबई : राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशानानिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची नियोजित सुटी रद्द करण्यात आलेली आहे. मंत्रायलीन व शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार दोन दिवस सुटी असते.
मात्र, यंदा राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या काही विभागांना सुटी नसल्याचे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. ‘सिडको’च्या व्यवस्थापकीय संचालकांना राज्य सरकारच्या नगर विभागाकडून आलेल्या परिपत्रकात सरकारी कर्मचाऱ्यांची नियोजित शनिवारची सुटी रद्द करण्यात आली असून त्यांना उपस्थित रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परिपत्रकातील माहितीनुसार, राज्य सरकारचे २०२४ या वर्षाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळाच्या बैठकीच्या दिनदर्शिकेत शनिवार दि. २९ एप्रिल हा कामकाजाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना या काळात उपस्थित रहाण्याच्या सूचना द्याव्यात ही विनंती नगर विकास विभागामार्फत करण्यात आलेली आहे.
All Saturday should be working so that many people can get their work done .Please the goverment should look into this matter and cancel their Saturday holiday once and for all.