Tuesday, April 22, 2025
घरमहाराष्ट्रसातारा मेंढ्यातून विश्वंभरबाबा दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान

सातारा मेंढ्यातून विश्वंभरबाबा दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान

प्रतिनिधी : वै. हभप गुरुवर्य भिकोबा महाराज देशमुख (गांजे) यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने विश्वंभरबाबा आषाढी पायी दिंडी सोहळा गेले २८ वर्षापासून अविरतपणे चालू आहे. याही वर्षी हा दिंडी सोहळा हजारो भाविकांना एकत्र घेऊन मेढा येथून येत्या शनिवार दि. २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता आळंदीकडे प्रस्थान करणार आहे.

दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष नारायण श्रीपती धनावडे (मामुर्डी). उपाध्यक्ष दत्तात्रय बबन खताळ (मेढा), सचिव भजन सम्राट तुकाराम देशमुख (गांजे), सौ. अंजना काशिनाथ भोसले. कार्याध्यक्ष विठ्ठल दगडू सापते, माजी अध्यक्ष हभप रामचंद्र महाराज पवार (निझरे) तसेच दिंडी सोहळा संचालक विलास आबा पवार, सचिनशेठ मगरे, अनिल कदम नाना, विठ्ठल महाराज कदम, हभप शिवराम महाराज मोरे, हभप दीपेश महाराज जाधव, हभप अनिल महाराज तोरणे, वैभवशेठ करंजेकर व विश्वंभर बाबा दिंडी सोहळा सर्व संचालक मंडळाच्यावतीने दिंडीचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील भाविकांनी दिंडी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments