Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसि.बा. जाधव यांचा सेवापूर्ती  सोहळा उत्साहात संपन्न

सि.बा. जाधव यांचा सेवापूर्ती  सोहळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : सिध्दार्थ बाळाराम जाधव अर्थात सिबा जाधव हे १ जुलै २०२४ पासुन ३३ वर्षांचे प्रदिर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत आहेत.

त्यांचा गुरुवारी दि.२७  जुन २०२४  रोजी भावसार सभागृह परेल मुंबई या ठिकाणी जाहीर सन्मान सोहळा आयोजित केला होता.

सिबा हे कोकणातील राजापूर तालुक्यातील मौजे शेजवली गावचे. ते उच्च शिक्षित  आहेत

मुंबई या ठिकाणी ते सुरुवातीला, पोलिस खाते त्यानंतर महानगर पालिकेतील सुरक्षा रक्षक खाते, आपत्ती व्यवस्थापन, तक्रार निवारण इत्यादी खात्यांमध्ये कार्यरत होते.

सन २००८ साली त्यांची महानगर पालिकेतील घ.क. व्य. खात्यामध्ये क.पर्यवेक्षक (तत्कालीन जेओ) या पदावर  बढती झाली.

या खात्यांमध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी केल्यामुळे ते नागरिक, लोकप्रतिनिधी,कामगार, सहकारी तसेच वरीष्ठ अधिकारी यांच्या मनामध्ये कायम घर करुन बसले आहेत.

सांगली या ठिकाणी अतिवृष्टी मुळे तेथील जनजीवन विस्कळित झालेले असताना मुंबई महापालिकाच्या वतीने सिबाने उत्तम आणि चोख कामगिरी पार पाडल्यामुळे ते वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठरले होते‌ अशा अनेक

त्यांच्या अशा या उत्तम कामगिरी मुळे ते कायम सर्वांच्या चर्चेचा विषय बनुन प्रसिद्धिच्या झोतात असंत.

सिबा हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे असल्यामुळे ते सदोदीत सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त असंत!

ते  कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तसेच  नियोजन उत्तम प्रकारे करीत असंत.

समाजाबरोबर आपल्या कुटुंबाला सुध्दा एका उंचीवर नेऊन ठेवले आहे,मुलीला डॉक्टर बनवून तसेच ईतर मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समाजीक सुधारणा करण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे, त्यांच्या 

धम्मपत्नी या केईएम ईस्पितळामध्ये नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

अशा सुशिक्षित कुटुंबाचा आम्हांस हेवा वाटतो.

सिबा आणि त्यांच्या धम्म पत्नी आपल्या वैवाहिक जिवन तसेच कुटुंबाचा पुर्वैईतिहासाचे सिंहावोलोकन करताना भावूक झाले होते.आपल्या जिवनाचा खडतर प्रवास कथन करून दोघांनी पण मनामध्ये अनेक वर्षांच्या कोंडून ठेवलेल्या भावनांना मोकळे केले.

 जाधव परिवाराचे सार्थकी झालेले जिवन हे त्यांच्या सुमधुर   भावुक वाणीने ऐकताना श्रोते सुध्दा शांत आणि स्तब्ध झाले होते.

सिबा हे सदोदीत तब्येतीने एव्हग्रीन असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी नेहमी आदर्शवत असायचे.

त्यांना घ.क.व्य. खात्याचा सिंबा म्हणून सहकारी ओळखायचे!

असा हा कर्तृत्ववान असणारा अधिकारी, कुटुंबवत्सल कुंटुब प्रमुख,आदर्शवत बाप, सामाजिक बांधिलकी जोपासणारा समाजसेवक, सगेसोयरे, सहकारी , मित्रपरिवार यांमध्ये प्रसिद्ध असणारा सिबा आज सन्मानाने सेवानिवृत्ती होताना पहायला मिळाले!

सिबा खरंच तू धन्य झालास!

तुझं आयुष्य सार्थकी झाले!

तुम्ही दोघा पत्ती-पत्नी नी आयुष्यातील केलेली खरी गुंतवणुक म्हणजे तुमची मुलगी झालेली डॉक्टर ही आहे. पुढील उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…..!!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments