Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमलकापूर - कराड च्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मलकापूर – कराड च्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

प्रतिनिधी : काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. बावनकुळे बोलत होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला डॉ. अतुल भोसले, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने – कदम, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला व बालकल्याण माजी सभापती  गितांजली पाटील, माजी नगरसेविका स्वाती तुपे, अनिता यादव तसेच शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लाप्पा बामणे, राजूभय्या मुल्ला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments