प्रतिनिधी : जनता दल सेक्युलर पक्षाची राज्यकार्यकरणी बैठक मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलर च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळत सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.तसेच जनता दल सेक्युलर हा महायुतीचा घटक पक्ष असून केंद्रात जसे माननिय एच. डी.कुमारस्वामी यांना अवजड उद्योग व स्टील हे केंद्रीय मंत्रिपद देऊन सन्मान केला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांना महायुतीने सतेत सामावून घ्यावे अशी मागणी जनता दल सेक्युलर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे केली. लवकरच याविषयी जनता दल से.शिष्टमंडळ मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महायुती समनव्यक आमदार प्रसाद लाड यांची भेट घेणार आहे.अशी माहिती प्रधान महासचिव अजमल खान यांनी दिली. तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, व स्थानिक स्वराज्य संस्था, या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा करत पुढील ध्येय धोरणे व करण्यात येणाऱ्या जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात्मक कार्यक्रम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीसाठी जनता जर सेक्युलरचे माजी आमदार गंगाधर पटणे, प्रधान महासचिव अजमल खान, महासचिव सलीम भाटी, उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई शहराध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सुरेंद्रकुमार वाजपेयी, प्रेमचंद पांड्याजी, ,गुजराती सेलचे अध्यक्ष किरण शेठ, ज्येष्ठ नेते ललितदादा रुणवाल, महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अँड.संग्रामसिंह शेवाळे,महिला अध्यक्ष अर्पणा दळवी, मुंबई महिला उपाध्यक्ष ज्योती बढेकर, युरी डॉनमिक गोनसास्वीस, मधुकर लक्ष्मण चेतप, संजय परब, डॉक्टर जयपाल चौगुले सांगली शहाराद्याक्ष, पठाण मेहमूद हैदर कंधार जिल्हा नांदेड, सुमित पाटील युवा अध्यक्ष सांगली, वसंतराव पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर,एड.बापूसाहेब देशमुख प्रदेश सरचिटणीस, संदेश मिरज, सतीश वारेकर नालासोपारा, रवींद्र माणिक ठाकूर पालघर, शशिकांत गायकवाड सांगली, नंदेश अंबाडकर अमरावती, नितीन लेंडे,श्रीकृष्ण नारेकर युवा जिल्हाध्यक्ष, अरुण जाधव जिल्हाध्यक्ष, वेद मडगे अमरावती, भगवान साळवे परभणी जिल्हाध्यक्ष, नामदेव दिपके मराठवाडा विभागीय सरचिटणीस, सुभाष तानाजी पतंगे बाळापूर,नागेश पाटोळे पुणे जिल्हाध्यक्ष, भगवान साळवी रायगड जिल्हाध्यक्ष, समाधान सरोदे पुणे, लक्ष्मणदास भानुषाली,निहाल मनेर, साहिल मुल्ला, कार्यालयीन सचिव भगवान साळवी,तसेच राज्यातील विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
