नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्ज आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे केजरीवाल यांचा तिहारमधील मुक्काम लांबला आहे.दरम्यान, उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी २० जून रोजी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना नियमित जामीन मंजूर केला होता. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या अर्जावर न्या. सुधीर कुमार जैन यांच्या न्यायासनासमोर २१ जून रोजी सुनावणी झाली होती.न्या. जैन यांनी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊन अंतिम निकाल राखून ठेवला होता.
तो निकाल न्यायालयाने आज दिला. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना कनिष्ठ न्यायालयाने ईडीचे मुद्दे विचारातच घेतले नाहीत. तसेच ईडीला युक्तिवाद करण्यासाठी पुरेशी संधी दिली नाही. ईडीने सादर केलेली तपशिलवार कागदपत्रे तूर्त विचारात घेता येणार नाहीत, हे कनिष्ठ न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण अन्यायकारक आहे, अशी परखड टिप्पणी करून न्या. जैन यांनी राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाचा निर्णय रद्द बातल ठरवला.
केजरीवाल यांच्या जमीन अर्ज फेटाळला; आता काही राहणार तुरुंगात
RELATED ARTICLES