कराड (प्रताप भणगे) : सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा संवाद मेळावा रविवार, दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी हॉटेल पंकज मल्टीपर्पज हॉल येथे दुपारी ४.०० वाजता संपन्न होणार आहे. या संवाद मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रमुख नेते आ. पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मा. खा. श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. रवींद्र पवार आदी पक्षांच्या नेत्यांसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या संवाद मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवराज पाटील, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन काशीद, कॅ. इंद्रजित गुजर, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. समीर देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष प्रशांत यादव, कराड दक्षिण युवक कॉग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणूक २०२४ सातारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा संवाद मेळावा महत्त्वाचा आहे. कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदार संघातील कराड तालुक्यातील इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने संवाद मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन वरील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.