प्रतिनिधी : टी डी पी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. चंद्राबाबू नायडूंसोबत अनेक नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आंध्र प्रदेश विधानसभेत एनडीएने एकतर्फी विजय मिळवला आहे. तेलुगू देसम पक्षाच्या नेतृत्वात एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांची त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. पवन कल्याण, नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि अनेक मंत्र्यांना राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी शपथ दिली. जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेता पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन करताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर सर्वांचे अभिनंदन ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एनडीए सरकार जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करून आंध्र प्रदेश राज्याला समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल, असा माझा ठाम विश्वास आहे.