Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघतर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी...

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघतर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी नियुक्ती

मुंबई (शांताराम गुडेकर ) सामाजिक, पर्यावरण, शिक्षण, ग्राहक संरक्षण, आरोग्य, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत असलेले विक्रोळी पश्चिम- पार्क साईट -घाटकोपर विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे विक्रोळी विभाग संघटक श्री. यशवंत खोपकर यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष बसवेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष शेखर उर्फ चंद्रभान कोलते यांच्यातर्फे यशवंत खोपकर यांची मुख्य संयोजक धडगांव तालुका पदी तीन वर्ष करिता नियुक्ती करण्यात आली आहे.माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार व्यापक जनहितासाठी प्रचार, प्रसार शिवाय भारतीय संविधान, भारतीय कायदे,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करून काम करण्याचे आदेश खोपकर यांना नियुक्ती वेळी दिले आहेत.खोपकर यांची निवड झाल्यामुळे घाटकोपर विधानसभा क्षेत्रातील गोर गरिब व दुर्बल,गरजवंत नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही.खोपकर यांची निवड झाल्याबदल विभागातील आजी-माजी शिवसेना पदाधिकारी यांनी श्री.यशवंत खोपकर यांना अभिनंदनासह पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments