प्रतिनिधी : यशोधन अनाथाश्रम वेळे याचे चालक रवी बोडके यांचे कार्य प्रेरणादायी- बाळासाहेब जगदाळे रवी बोडके हे कलियुगातील देव माणूस असून त्यांनी चालवलेले यशोधन अनाथ आश्रम वेळे तालुका वाई येथील कार्य प्रेरणादायी आहे. सद्गुरु शाकाहारी हॉटेलचे मालक बाळासाहेब जगदाळे यांनी आपला मुलगा प्रसन्न याच्या लग्नात मानपानावर होणारा खर्च टाळून पंचवीस हजार रुपयाचा चेक यशोधन अनाथाश्रम वेळे यांना दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की या ठिकाणी ज्यांना कोणी नाही, जे अनाथ आहेत जे पीडित आहेत अशा 70 ते 80 स्त्री-पुरुषांना रवी बोडके शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय आधार देत आहेत . यापुढील काळातही त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. दीपक भुजबळ गुरुजी म्हणाले की, रवी बोडके गेली 17 वर्ष अनाथ आश्रम चालवत आहेत. विशेष करून कोरोना काळात घरातील घरातील लोकही एकमेकांना विचारत नव्हते त्या काळात रवी बोडके व त्यांचे कुटुंबीय अशा अनाथ लोकांना जवळ घेऊन,चौकशी करून, त्यांची सेवा करत होते त्यांचे कार्य महान आहे. यशोधन अनाथाश्रम वेळे हे तीर्थक्षेत्र आहे दरमहा या ठिकाणी येऊन शक्य ती मदत केली जाईल. याठिकाणी उजाड माळरानावर रवी बोडके यांनी नंदनवन बनवले असून भारतातील विविध जातीपंथाचे निराधार आजारी असलेले किंवा घरातून निघून आलेले लोक या ठिकाणी येतात शासकीय अधिकारी त्यांना या ठिकाणी सोडतात असे रवी बोडके यांनी सांगितले. या ठिकाणी झाडे लावले असून त्या लोकांना औषध उपचार भोजन नाष्टा वेळेत दिला जातो अशी सांगितले तसेच या ठिकाणी गोशाळा सुरू केल्याचेही रवी बोडके यांनी सांगितले. ज्यांना वस्तुरूपाने धान्यरूपाने रोख रूपाने मदत करायचे असेल त्यांनी रवी बोडके फोन नंबर 9922424236 संपर्क साधावा देणगीदारांना 80G सवलत आहे.
जगदाळे कुटूंबाकडून लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून केली यशोधन अनाथाश्रमाला मदत
RELATED ARTICLES