प्रतिनिधी : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील कलकत्तावाला चाळ, नया नगर दादर प्रभादेवी येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजने अंतर्गत गेली अनेक वर्ष होत असलेल्या रहिवाशांवरील अन्यायाविरूद्ध नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांनी शिवसरण भवन येथे बैठक (जनता दरबार) घेऊन सविस्तर माहिती त्या झोपडीधारक यांच्या सूचना,समस्या जाणून घेऊन यावरती आवाज उठवत एस.आर.ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन संबंधित झोपडीधारक यांना न्याय मिळवून दिला.
याप्रसंगी शिवसेना उपनेत्या श्रीमती विशाखा राऊत, उपसचिव प्रविण महाले, विभागप्रमुख महेश सावंत, महिला विभागसंघटिका श्रीमती श्रद्धा जाधव, शाखाप्रमुख अजित कदम, शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.