तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने पाण्याची बचत व्हावी म्हणून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर पावसाळा लांबला तर पाण्याची अधिक टंचाई होऊ शकते. त्यामुळे पालिकेमार्फत आता शहरात विभागवार आठवड्यातील दोन दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन पाणी कपात सुरू केली आहे.
स्वतः च्या मालकीचे धरण असल्याने जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे. नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो. सध्या या धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
सोमवार, गुरुवार – बेलापूर
मंगळवार, शनिवार – कोपरखैरणे
बुधवार, रविवार – घणसोली
गुरुवार, सोमवार – वाशी
शुक्रवार- ऐरोली (एक दिवस) मंगळवार,
शनिवार – नेरूळ रविवार,
बुधवार – तुर्भे
एमआयडीसीत उद्या दिवसभर पाणी बंद
एमआयडीसीने बुधवारी (ता. ५) जलवाहिनीची कामे तातडीने हाती घेतल्याने एमआयडीसीचे पाणीदेखील २४ तास बंद राहणार आहे. त्यामुळे बुधवारी पाण्याविना नवी मुंबईकरांचे हाल होणार आहेत. यासाठी पाणी जपून वापरावे लागणार आहे.