Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकुडाळच्या कॅडबरी बॉयने दुसऱ्याच्या घरावर दगडी मारू नये- सदाशिव सपकाळ

कुडाळच्या कॅडबरी बॉयने दुसऱ्याच्या घरावर दगडी मारू नये- सदाशिव सपकाळ

सातारा (अजित जगताप) : सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त बुद्धी व वयाने बालिश व तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या कुडाळच्या सौरभ राजेंद्र शिंदे यांनी व्यक्तिगत पातळीवर टीका केली. या टीकेला उत्तर द्यायचे नव्हते कारण, नोंद घेण्यासारखे व्यक्तिमत्व नाही. पण, कार्यकर्त्यांनी म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोखवू नये.म्हणून खुलासा करण्यास लावलेले आहे. कॅडबरी बॉय ने टीका करताना विचार करावा. अन्यथा त्याच्या राजकीय बापाला सुद्धा त्याची फळ भोगावे लागतील. असा गर्भित इशारा जावळीचे माजी आमदार सदाशिव सकपाळ यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. काचेच्या घरात सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेल्या बाळाने मातीच्या घरात राहणाऱ्याच्या घरावर दगड मारू नये .अन्यथा आपल्या काचेच्या घराला तडा पडेल. असे स्पष्ट केले.

यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी पत्रकारांना सांगितले की १९९५ साली शिवसेनेचे आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले. खरं म्हणजे या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. युतीचे सरकार आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून मंत्री मंडळात खूप सहकार्य मिळाले. तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी महाराष्ट्रातील नियोजित साखर कारखान्या संदर्भात स्थानिक आमदार म्हणून मला विचारना केली. त्यावेळेला जावळी सारख्या डोंगराळ भागात सहकारी माध्यमातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभारण्यात येत आहे. या साखर कारखान्यासाठी आदरणीय व गुरुवर्य माजी आमदार लालसिंगराव शिंदे, आदरणीय राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री जोशी यांना सांगितले की, राज्य शासनाने कर्जाला हमी व शासकीय भांडवल देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. तसेच आदरणीय शिंदे यांच्या विचारानुसार सर्व संचालकांची निवड करा. एवढंच नव्हे तर प्रतापगड साखर कारखान्याच्या उभारणीपूर्वीच नेवेकरवाडी व परिसरातील काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला होता. या वेळेला आमदार म्हणून मी आदरणीय शिंदे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांशी बैठक घेऊन त्यांना तातडीने जमीन देण्यास विनंती केली. त्या विनंतीला मान दिल्यामुळेच तीन वर्षात साखर कारखाना ट्रायल सीजन पार पडला. आणि कर्ज प्रकरणासाठी तात्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार आनंदराव अडसूळसाहेब यांची भेट घेणे गरजेचे आहे. असे आदरणीय लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. आपण वेळ पडल्यास दिल्लीलाही जाऊ असे सूचित केले परंतु, सातारचे सुपुत्र असल्यामुळे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अडसूळ साहेब यांना शाहूपुरी येथील माझ्या निवासस्थानी आणून या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला सर्व सहकार्य करण्याची विनंती केली. ती त्यांनी विनंती मान्य केली .यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर प्रतापगड सहकारी साखर कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत असताना आदरणीय शरद पवार साहेब यांची बारामती व मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी भेट घेतली .प्रतापगड सहकार साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी. यासाठी कारखान्याच्या वतीने श्रीमती सुनिता शिंदे, आमदार शशिकांत शिंदे व स्वतः सौरभ शिंदे व मी उपस्थित होतो. यानंतर २००४ साली प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी उभारणीनंतर निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता जावली तालुक्यात ग्लुकोज कारखाना उभारणीच्या संकल्प केला. याला उदंड प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री शिवाजीराव नाईक घेऊन जावळी तालुक्यातील कारखान्याची निर्मिती होत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला होता. यासाठी २१०० रुपये प्रमाणे भाग भांडवल गोळा केले. ९० टक्के पवारवाडी येथील जमिनीचा करार केला. पण, राजकीय अडथळ्यामुळे एखादा प्रकल्प उभा करून तो बंद पडणे. ही नामुष्की आपल्या नावावर नको. म्हणून काही निर्णय घ्यावे लागले. हा कारखाना उभारण्यासाठी राज्य शासनाची मदत घ्यावी असे ठरवले होते. राज्यातील तेरा सहकारी ग्लुकोज कारखान्याबरोबर जावळी खोरे सहकारी ग्लुकोज कारखान्यालाही कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली पण सहकारी साखर कारखाने व इतर कारखाने अडचणी झाल्यामुळे राज्य शासनाकडून सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे हा ग्लुकोज कारखाना होऊ शकला नाही. त्यामुळे जेवढे शेअर्स गोळा केलेले आहेत. त्याची सर्व रक्कम प्रत्येकांना परत करावी. यासाठी हालचाली सुरू केलेले आहेत एका महिन्याच्या कालावधीसाठी याबाबत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. असे सदाशिव सकपाळ यांनी सांगितले. सदर संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल व इतर बाबी या स्पष्ट आहेत. माझ्या आमदारकीच्या काळात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. कुणीही आरोप केलेला नाही. मी व्यक्तिगत जीवन जगताना पारदर्शकता आणलेली आहे. त्यामुळे माझ्यावर व्यक्तिगत टीका टिपणी करणारांनी चांगल्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे होता. माझी मुलं उच्च शिक्षण घेऊन आपापल्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत. बाप म्हणून मला त्याचा अभिमान आहे. अजूनही माझ्या कोणत्याही उत्पन्नावर किंवा संपत्तीवर ते अवलंबून नाहीत. उलट माझी एकसष्टी साजरी करताना मला आलिशान गाडी भेट देण्याचे त्यांनी ठरवलं. पण, मी स्पष्टपणे नकार दिला. स्टेट बँकेचे कर्ज काढून पांढऱ्या शुभ्र गाडीतून गेली दहा वर्षे मी फिरत आहे. माझ्या गाडीच्या काचा कधीही बंद नसतात. कारण मला लोकांच्यातूनच आमदार म्हणून निवडून दिलेले आहे. आणि भविष्यातही तसाही चमत्कार घडू शकतो. सांगण्यासारखे बरच आहे पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा त्याला वेगळं वळण होईल असं होऊ नये. यासाठी लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत मी शांत बसलो होतो. जावळीकरांच्या आग्रहामुळे मी माझी भूमिका मांडत आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहे. त्यांच्या राजकीय बापाला सांगू इच्छितो की, मी थेट इशारा देत आहे की, घोडं मैदान जवळ आलेले आहे. माझी ताकद काय आहे? हे मला बोलल्यास लावू नका .अन्यथा मला कमजोर समजण्याची चूक केली तर या ठिणगीचा वनवा पेटला तर आपल्या राजकीय जीवनाचा अस्त होईल. असे कोणाचेही नाव न घेता माजी आमदार सदस्य सकपाळ यांनी सांगितले. या वेळेला त्यांच्यासोबत शिवसेनेचे कोरेगावचे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख? हनुमंतराव चवरे -पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments