Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्र२ जूनपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात...

२ जूनपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात…

भारतासोबत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज,  पाकिस्तान हे देश देखील विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. न्युझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका हे देश देखील उलेटफेर करून अंतिम फेरीत पोहचू शकतात  कारण टी २० मध्ये कोणता संघ विजयी होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. सामन्यातील एखादे षटक किंवा एखादा बळी सामन्याचे चित्र पालटू शकतो. शिवाय अमेरिकेत पहिल्यांदाच स्पर्धा होत असल्याने तेथील खेळपट्ट्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत याचा अंदाज कोणालाही  नाही त्यामुळे नव्या खेळपट्ट्यांवर कोणता संघ कशी कामगिरी करेल यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत एकमात्र नक्की की जर भारतीय संघाने आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर भारताला विजेतेपदापासून कोणीही रोखू शकणार नाही तसे झाले तर भारताचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपेल. २०१३ नंतर भारताने आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही. २००७ ला भारताने पहिला टी २० विश्वचषक जिंकला त्या नंतर भारताला टी २० चा विश्वचषक जिंकता आला नाही. यावेळी भारतीय संघ ती करामत करेल आणि टी २० विश्वचषकावर देशाचे नाव कोरल असा विश्वास देशातील १४० कोटी जनतेला वाटत आहे. भारतीय संघाला टी  २० विश्वचषकासाठी मनापासून शभेच्छा! 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments