प्रतिनिधी : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम चा आहे. यावेळी विठ्ठल मंदिरात नव्याने एक तळघर सापडले आहे. यात यात विष्णू रुपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती तसंच मोठया चार मूर्ती, पादुका, नाणी अशा वस्तू देखील आढळून आल्या. यातील दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीवर धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही. मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती नेमक्या कोणत्या देवाच्या आहेत हे समजणार आहे. हे तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. सध्या या तळघराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पंढरपूर येथे 15 मार्चपासून गाभार्यात जतन व संवर्धन करण्याचे काम उरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या 2 जून पासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
