सातारा(अजित जगताप) : सातारा नगरपालिकेच्या वतीने हरितक्रांती घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचाच भाग म्हणून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारा शहरालगत तीस हजार विविध जातीच्या वृक्षाचे लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सातारा नगरपालिकेचे मुख्यधिकारी अभिजीत बापट व विविध खात्याचे प्रमुख तथा कर्मचारी यांच्या सहकार्याने भैरोबाचा डोंगर या ठिकाणी पंधरा हजार व इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पंधरा हजार असे मिळून तीस हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सध्या खड्डे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. भर उन्हाळ्यात आतापर्यंत बाराशे ते तेराशे खड्डे खणून झालेले आहेत. येत्या आठ दिवसात उर्वरित खड्डे खोदून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या आगमनासोबतच या वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये भावा पाच पेट, आपटा फोनचाफा ,पिवळा चाफा, मिचेलियाचा पाक, कांचन, बॉटल ब्रश, पारिजात, कैलास पत्ती, बेल, बकुळा, बूत ,कदम, बुडखेरी, चिंच, गोरख चिंच, आवळा, जांभूळ, विलायती चिंच, बोर, बोकर, कडूलिंब, महागुनी, अर्जुन, तोबाई ,पिंपळ, आंबा, फणस, नारळ, निम, कुसुम, रानभेंडी, त्याचबरोबर इतर गुणकारी व औषधी तसेच फळ देणाऱ्या रोपांची लागवड केली जाणार आहे. याचबरोबर या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी सातारा नगरपालिका पार पाडणार आहे.
सातारा नगरपालिकेच्या वतीने तीस हजार वृक्ष लागवडीचे मोहीम
RELATED ARTICLES