प्रतिनिधी : दादर चैत्यभूमी येथे दलित पँथरचा ४४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला,या कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित युथ पँथर चे अध्यक्ष निलेश मोहिते होते तर सूत्रसंचालन धम्मु आगरकर यांनी केले.
विठ्ठल उमप थेटर प्रस्तुत शाहीर संदेश उमप,शाहीर चंद्रकांत शिंदे, आश्विन निभावणे,विनोद विद्याधर यांनी बुद्ध,भीम, पँथर गीतांचा सुरेख कार्यक्रम सादर केला.
विद्यार्थि नेते राहुल सोनपिंपळे यांना ह्या वर्षीचा पँथर पुरस्कार प्रधान करण्यात आला.
दलित पँथर चे सहसंस्थापक ज वी पवार,ज्येष्ठ पँथर, रिपब्लिक नेते अर्जुन डांगळे, पँथर नेते सुरेश केदारे यांनी मार्गदर्शक केले.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पँथर नेते सुमेध जाधव,पत्रकार दिपक पवार, विद्रोही कवी बबन सरवदे, माजी न्याय मूर्ती सोनावणे उपस्थित होते.
सदर प्रसंगी रक्तदाब शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर व हुशार गरजू विद्यार्थ्यांना शालेयउपयोगी वस्तूचें वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई सह उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
