प्रतिनिधी : जर तुम्ही अयोध्या येथील राम लल्लाचे दर्शन करण्यास जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरातील फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करणे आता थांबणार आहे. म्हणजेच मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री रामजन्मभूमीत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून लोक मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जात आहेत. मात्र ट्रस्ट आणि प्रशासन यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत, शनिवारपासून मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सामान्य जनता असो की व्हिआयपी असो, कोणीही राम मंदिरात मोबाईल घेऊन जाऊ शकणार नाही. मंदिराचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी भाविकांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
अयोध्या श्री राम मंदिर येथे मोबाईल वापरण्यास बंदी
RELATED ARTICLES