तापोळा(संजय सकपाळ) : – काही दिवसांपूर्वी वाळणे ता महाबळेश्वर या ठिकाणी दोन मुलींचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही मुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळणे या शाळेत इयत्ता 6 वी शिकत होत्या. मुली दुर्घटनेमध्ये गमावल्या या दुःखद घटनेने सपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती…
या कुटुंबियांची महाबळेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब, यांनी शिक्षकांच्या समवेत सांत्वन पर भेट घेतली होती. या दोन्ही मुली अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिक्षकांनी सामाजिक संवेदनाच्या भावनेतून दुर्घटनाग्रस्त कुटूंबाना आर्थिक मदत करावी. असे आवाहन शिक्षकांना करण्यात आले. शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी केलेले आवाहनाला तालुक्यातील शिक्षक बांधवांनी उत्तम प्रतिसाद देत 115500 रु मदत निधी जमा केला.
प्राप्त झालेला निधी दुर्घटनाग्रस्त मुलींच्या कुटुंबियांना वाळणे शाळेत जाऊन मा गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब, श्री संजय संकपाळ संचालक शिक्षक बँक, श्री चंद्रकांत जंगम सर केंद्रसंचालक,श्री बाळकृष्ण कदम सर, श्री लोणकर सर, व वाळणे केंद्रातील अन्य शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थिती मदत निधी देण्यात आला.
सदर निधी पालक आपल्या अन्य मुलाच्या नावे गुंतवणूक करून मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग करणार आहेत. ही मदत दीर्घकाळ स्मरणात राहील..
सामाजिक संवेदना दाखवून मदत करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचे आभार मानले.
वाळणे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विध्यार्थ्यांच्या कुटूंबियांना महाबळेश्वर शिक्षण विभागाची आर्थिक मदत.
RELATED ARTICLES